
नमस्कार
'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हेच खरे! आईच्या आकस्मित जाण्याने मी तर पारच खचून गेले होते.
या मातृशोकाने बाहेर पडत असताना तिच्या जाण्याने पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १९ च्या रिक्त जागेचा प्रश्न निर्माण झाला आणि माझे नाव पुढे आले. एकीकडे मातृशोक तर दुसरीकडे आईच अर्धवट राहिलेल पनवेलच्या विकासाचे स्वप्न. . ! थोऱ्यामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मी समाजकारणाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. पनवेल भारतीय जनता पक्षश्रेष्ठी आणि सर्वानीच मला पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले आणि गेली एक वर्ष माझा हा प्रवास यशस्वीरित्या सुरु आहे. माझ्या कुटुंबीयांनी, मित्रपरिवारानी आणि माझ्या हितचिंतकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले
नवीन गोष्टी शिकत पडत धडपडत पण पुन्हा नव्याने उभं राहत मी या क्षेत्रात वाटचाल करत आहे. पक्षाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी निष्ठेने सचोटीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. पंडित दिन दयाळ उपाध्याय ह्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या प्रभागाची मी मातृत्व मायेने काळजी घेत आहे. माझ्या पनवेल नगरीच्या विकासात, आझे योगदान नक्कीच उत्तम असेल याची मी खात्री देते. परिश्रम, सचोटी आणि सातत्य या त्रिसूत्रीचा आधारे माझा प्रभाग. माझं पनवेल आणि पर्यायाने माझे राष्ट सक्षम करण्यात भरीव योगदान देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
जगात महासत्ता बनणाऱ्या भारतचे सक्षम नेतृत्व आपले आदरणीय पंतप्रधान मा नरेंद्र मोदीजी करत असताना महारसाहतराचे अभ्यासू विरोधीपक्षनेते मा देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत भारतीय जनता पक्षाची नगरसेविका या पदावर कार्यरत असताना मी जे कार्य करू शकले त्याचा दृष्टिक्षेप आपणासमोर ठेवताना मला विशेष आनंद होत आहे.
आसच स्नेह असुद्या. . . .
धन्यवाद. . !!!!
रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे
get in touch nowGallery
Gallery





53
Social Work
15
Society Visit
182
Grains Distribution